सुस्वागतम!

नमस्कार! 'पुस्तकांचं गाव' भिलार मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. पाचगणी ते महाबळेश्वर रस्त्यावरील पाचगणीपासून सुमारे ५ कि.मी. अंतरावर असलेल्या भिलार गावात आता एक अभिनव संकल्पना आता पुस्तकप्रेमींसाठी रुजू झाली आहे. कल्पना तशी साधी आहे पण अनोखी आहे.. इथे या, पुस्तके हाताळा, चाळा, वाचा.. ते देखील अगदी मोफत. थोडी थोडकी नव्हे तर जवळ जवळ १२००० ते १५००० पुस्तके.. या पुस्तकांची व्यवस्था त्यांच्या त्यांच्या साहित्यप्रकारानुसार गावातील वेगवेगळ्या २२ ठिकाणी केली आहे. यातील काही ठिकाणी तुम्ही निवास करू शकता, चहा - कॉफीचे घुटके मारत पुस्तकांचा आस्वाद घेऊ शकता (ही सोय मात्र मोफत नाही याची कृपया नोंद घ्यावी)

या कल्पनेची अन प्रकल्पाची सुरुवात झाली काहीशी अशी झाली - महाराष्ट्र राज्याचे मराठी भाषा व सांस्कृतिक मंत्री मा. श्री. विनोद तावडे यांनी दि. २७ फेब्रुवारी, २०१५ रोजी एका समारंभात बोलताना इंग्लंडमधील ‘हे ऑन वे’ या पुस्तकाच्या गावाचा संदर्भ देऊन, महाराष्ट्रातही असे ‘पुस्तकांचं गाव’ नक्की आकाराला येऊ शकेल, असा विचार मांडला.

या नव्या, अनोख्या, कल्पक व उत्साहवर्धक विचाराचे प्रसारमाध्यमे, साहित्यिक आणि सामान्य जनतेनेही स्वागत केले. याबाबत अनेक लेख व बातम्या छापल्या गेल्या. विविध समारंभ-संमेलनांतून विचार मांडले गेले. खुद्द मा. मंत्रिमहोदयांनी प्रकाशक, साहित्यिक व विचारवंतांशी याबद्दल चर्चा केली. अन या साऱ्यातूनच १ मे २०१७ रोजी भिलार पुस्तकांचे गाव म्हणून रुजू झाले.

पुस्तकगावाचे लोकार्पण

४ मे २०१७ या रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुस्तकांच्या गावांचे लोकार्पण झाले.

पुढील माहिती

मराठी भाषा मंत्री यांचे मनोगत

पुस्तकांचे गांव ही संकल्पना कशी आकराला आली याबाबत जाणून घेऊयात सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांचे मनोगत.

पुढील माहिती

मान्यवरांच्या भेटी

अनेक मान्यवरांनी पुस्तकगावाला भेट दिली आणि साहित्याच्या वेगवेगळ्या दालनात पुस्तकांचा आनंद घेतला.

पुढील माहिती

उपक्रम

 • वाचनध्यास... सलग वाचनाचा उपक्रम
  १५ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रात वाचन प्रेरणा दिन (स्व. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम जयंती) साजरा केला जातो.
  या वर्षी या वर्षी शनिवार, दि. १३ ते रविवार, दि. १४ ऑक्टोबर, २०१८ रोजी पुस्तकांच्या गावात 'वाचनध्यास... सलग वाचनाचा उपक्रम ' या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. होतकरू वाचकांनी, पुस्तकप्रेमींनी भिलारमध्ये येऊन, आपल्या आवडत्या साहित्यप्रकाराच्या दालनात बसून दोन टप्प्यांत सलग आठ ते दहा तास वाचन करणे, अशी या उपक्रमाची संकल्पना आहे.

 • पाऊसवेळा: एक अनोखी मैफल
  पावसाआधीचा पाऊस ते परतीचा पाऊस...
  आतला नी बाहेरचा पाऊस...
  मराठीतील नव्या जुन्या
  लेखकांच्या शब्दांतून झरणारा पाऊस...

  १४ ऑक्टोबर रोजी वाचन प्रेरणा दिनाच्या (१५ ऑक्टोबर) पार्श्वभूमीवर पुस्तकांच्या गावामध्ये एक अनोखी मैफल रंगणार आहे. आपण अवश्य या! स्थळ व वेळ:
  श्री जननीमाता मंदिर सभागृह, भिलार | रविवार दि. १४ ऑक्टोबर २०१८ - दुपारी ४.३० वाजता

संपर्क तपशील

प्रकल्प कार्यालय
द्वारा- श्री. शशिकांत भिलारे
कृषीकांचन, मु. पो. भिलार,
ता.महाबळेश्वर, जि.सातारा
संपर्क- 02168-250111
pustakanchgaav.rmvs@gmail.com

प्रकल्प नकाशा

|

कसे पोचाल

google map for my website